‘पिढीजात’ : यत्र-तत्र-सर्वत्र व्यापून असलेल्या प्रशासकीय सत्तेचा पंचनामा
‘पिढीजात’ ही सहकार क्षेत्राबरोबरच भारतीय शासन-प्रशासन व्यवस्थेचा चेहरा मांडत ग्रामविकास, शिक्षण, पोलीस प्रशासन, राज्यकर्ते, कार्यकर्ते, शेतकरी, कामगार, शेतकरी संघटना, जातवास्तव, बहुजन समाजाच्या नेतृत्वाकडून होणारा अपेक्षाभंग, राजकारणातील नैतिक मूल्यांचा र्हास, माणसांचे बेगडीपण, बुद्धिजीवी वर्गाचे अध:पतन प्रभावीपणे मांडते. समाजातील एका क्षेत्राचे सूक्ष्म पदर ती उकलत नेते.......